Mumbai Dharavi: 1 हजार रुपयात बोगस लसीकरण प्रमाणपत्र ABP Majha

Continues below advertisement

करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा लसीकरण वाढण्यासाठी प्रयत्न करत असताना धारावीमध्ये लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्राची एक हजार रुपयांत सर्रास विक्री करण्यात येत होती. लसीकरण मोहिम सुरू झाल्यानंतरही धारावीतील लसीकरणावर प्रशासन विशेष लक्ष देत आहे. याच धारावीत बनावट लसीकरणाचे नवे प्ररूप उभे राहिले आहे. अवघ्या एक हजार रुपयांत लशाच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्राची सर्रास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. एकही दिवस मुंबई बाहेर न जाता बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram