Mumbai Devi Temple : मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी

Continues below advertisement

Navratri 2022 : हिंदू पंचागानुसार, दरवर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेसाठी (Ghatstahapana) आज (26 सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे म्हणजेच देवी शैलपुत्रीचे (Devi Shailpiutri) पूजन केले जाते. शारदीय नवरात्रीत दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा सुरू होते. मुंबईच्या मुंबादेवी मंदिरातही नवरात्रोत्सवाला मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरुवात झालीय... मुंबादेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram