Mumbai Electricity : मुंबईत प्रचंड उकाडा, बुधवारी झाली विजेची रेकॉर्डब्रेक मागणी ABP Majha
Continues below advertisement
उन्हाळ्यातील शेवटच्या दिवशी आज मुंबईकरांचा चांगलाच घामटा निघाला. तापमानाचा पारा 34 अंशांवर गेलेला असतानाच हवेतील आर्द्रताही कमालीची वाढली आहे. त्यामुळे वाढलेल्या उकाडय़ाने मुंबईकर अक्षरशः घामाघूम झाले होते. या जिवघेण्या उकाडय़ातून सुटका करून घेण्यासाठी घर, कार्यालयात सर्वत्र एसी, पंखे, कुलर सुसाट धावत होते. त्यामुळे आज मुंबईची विजेची मागणी 3909 मेगावॅट एवढी रेकॉर्डब्रेक नोंदली आहे.
Continues below advertisement