Mohan Delkar Death | दादरा, नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं
दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईत मरिन ड्राईव्हमधील हॉटेलमध्ये ते मृत अवस्थेत आढळले. आत्महत्येच्या ठिकाणी सुसाइड नोट सापडली असून ती गुजराती भाषेत लिहिलेली आहे. ते दादरा आणि नगर हवेली लोकसभा क्षेत्रातील अपक्ष खासदार होते. सोमवारी मरिन ड्राइव्ह हॉटेलमध्ये मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.
Tags :
South Mumbai Hotel Mohanbhai Sanjibhai Delkar Mohanbhai S Delkar MP Commits Suicide Mohanbhai Mohan Delkar Mohanbhai Delkar Dadra And Nagar Haveli