Mumbai मधल्या Dadar मधील प्रसिध्द Suvidha Showroom च्या मालकाचा मृत्यू : ABP Majha
मुंबईतल्या दादरमधील प्रसिद्ध 'सुविधा शोरुम'च्या मालकाचे ४६ वर्षांचे पुत्र कल्पेश मारू यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका फार्महाऊसच्या गेटजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्या फार्महाऊसच्या मालकांनी वसईतल्या मांडवी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी अधिक तपास केला असता तो मृतदेह 'सुविधा शोरुम'च्या मालकाच्या चिरंजीवाचा असल्याचं निष्पन्न झालं. मृत व्यक्तीचं नाव कल्पेश शांतीलाल मारू असं आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ एक बाटली आणि गोळ्यांची रिकामी पाकिटं सापडली. त्यामुळं कल्पेश यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कल्पेश मारू हे सोमवारपासून बेपत्ता होते. तसंच त्यांनी याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.