Mumbai curfew | गोरेगावच्या आरे कॉलनीत मुंबईकरांची मॉर्निंग वॉकसाठी गर्दी
Continues below advertisement
राज्यात संचारबंदीचा आज चौथा दिवस आहे. मात्र गोरेगावच्या आरे कॉलनीतील 20 नंबर पिकनिक पॉईंट परिसरात आज सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. खरंतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली, मात्र नेहमीप्रमाणे आजही मुंबईकर मॉर्निंग वॉक करण्यासाठी आरे कॉलनीच्या रस्त्यावर आलेले पाहायला मिळाले. तर या मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुंबईकरांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवलेले पाहायला मिळाले. मॉर्निंग वॉकसाठी आलेले लोक बिना मास्क घालून फिरताना दिसून आले.
Continues below advertisement