Mumbai : छठपूजेला बिहारला जाणाऱ्यांची रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी
Continues below advertisement
छठपूजेसाठी बिहारला जाण्यासाठी विशेष गाडीसाठी परप्रांतियांनी विविध रेल्वे स्थानकांवर गर्दी केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या भागलपूर एक्स्प्रेसला तुफान गर्दी झाली होती. गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती.प्रवासी ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे कन्फर्म तिकीटं असणाऱ्या प्रवाशांनाही आत चढणं शक्य होत नव्हतं. अखेर आरपीएफच्या जवानांनी या प्रवाशांना सुरक्षितरित्या ट्रेनमध्ये चढवण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दी प्रचंड असल्याने हे प्रयत्न निष्फळ ठरत होते. त्यामुळे छठ पूजेसाठी जाणाऱ्या मुंबईमधील प्रवाशांची संख्या प्रचंड वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.
Continues below advertisement