Mumbai Covid warrior : पोलीस, रेल्वे कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात ABP Majha

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतेय.... आणि याच कोरोनाच्या विळख्यात डॉक्टर, पोलीस, रेल्वे कर्मचारी, सरकारी कर्मचारी अडकलेत. मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झालाय. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह डझनभर वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. आत्तापर्यंत मुंबई पोलीस दलातील ४८६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीये. त्यातील १०४ पोलिसांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय...  तिकडे
पश्चिम रेल्वेच्या ५०० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालीये.. यातील अनेक कर्मचाऱ्यांना सौम्य आणि अतिसौम्य लक्षणं असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. संसद भवनातही कोरोनाचा शिरकाव झालाय. ६ आणि ७ जानेवारील संसद भवनातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.  त्यामध्ये ४०० कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत... कोरोना योद्धेच कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने या लढ्यात नवं संकट उभं राहिलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram