Mumbai Corona : मुंबईतील मॉल्समध्ये प्रवेश करण्यासाठी अँटिजन टेस्ट बंधनकारक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मॉल्समध्ये प्रवेश करण्यासाठी अँटिजन टेस्ट करणं बंधनकारक आहे. त्यामुळे जर तुम्ही मॉलमध्ये फिरायला जायच्या बेतात असाल तर 250/- रूपयांची ही टेस्ट करण्याची तयारी ठेवा. अथवा नजीकच्या काळात तुम्ही कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करणं तुम्हाला बंधनकार आहे. काहीजण ही टेस्ट करण्यास राजी होतात, मात्र बरेचसे ग्राहक टेस्टच्या नवानंच आल्या पावली परत जाणं पसंत करत आहेत. त्यामुळे मॉल्समध्ये येणा-यांची संख्या नाममात्र असल्याचं मॉल्सचे चालक सांगत आहेत.