पाचव्या सेरो सर्वेत ॲंटीबाॅडीजचं प्रमाण मुंबईकरांमध्ये ८६.८६ टक्के आढळून आलं आहे. यात काही लोकांची व्हॅक्सिन घेतलं होतंत्यांच्यामध्ये ९० टक्के जणात ॲंटीबाॅडीज आढळून आल्या आहेत. तर व्हॅक्सिन व घेतलेल्यांमध्ये ८० टक्के लोकांमध्ये ॲंडीबाॅडीजआढळल्या आहेत असं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं. दरम्यान, गणेशोत्सवानंतरचे १५ दिवसमहत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. ज्यात पालिकेची बाहेरुन आलेल्यांवर लक्ष असणार आहे. मुंबईत बाहेरुन आलेल्यांनी कोरोना चाचणीकरुन घेण्याचे आवाहन देखील काकाणी यांनी केलं आहे.