Coronavirus | कोरोनाचा पर्यटनाला फटका, 'वीणा वर्ल्ड'च्या आंतरराष्ट्रीय टूर रद्द
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोनाचा फटका हळूहळू विविध व्यवसायांना होतो आहे आणि याचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे तो पर्यटन व्यवसायाला आणि पर्यायाने विमान आणि टूर कंपन्यांना. भारतातली एक अग्रगण्य टूर कंपनी असलेल्या वीणा वर्ल्डनं त्यांच्या पुढील एका महिन्यातील सर्व आंतरराष्ट्रीय टूर्स रद्द करत असल्याची जाहिरात वृत्तपत्रांत दिली आहे. मात्र देशांतर्गत टूर्सबद्दल कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.