Mumbai : पावसाचं प्रमाण वाढल्याने मुंबईसह राज्यात डोळ्याची साथ, मुंबई पालिका सतर्क
बातमी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची. मुंबईसह राज्यात सध्या डोळे येण्याचं प्रमाण वाढलंय. सध्या पावसाळा असल्याने हवेतील आर्द्रता वाढून डोळे येण्याची विषाणूजन्य साथ पसरु शकतेय याकरता मुंबई महापालिकेने सरकारी आणि खासगी दवाखान्यांना सतर्क केलंय. तसंच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. अँडिनो विषाणूमुळे ही साथ येत असते. मुंबईत सध्या यामध्ये लक्षणीय वाढ झालेली नसली तरी सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी झालाय, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन पालिकेने केलंय.