Mumbai : शिंदे आणि फडणवीसांच्या हस्ते कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Coastal Road Worli Sea Link Bridge : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या हस्ते कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण
मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाची एक बाजू आजपासून खुली करण्यात येतेय. यामुळे दक्षिण मुंबईहून वांद्रेच्या बाजूला जाताना थेट सी-लिंक घेता येणार आहे. कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडण्यासाठी बीएमसीनं धनुष्याच्या आकाराचा आर्च-ब्रिज उभारला. या पुलामुळे नरीमन पॉईंटवरून वांद्रे गाठणं केवळ १० ते १५ मिनिटांत शक्य होणार आहे. दरम्यान हा टप्पा लोकांसाठी खुला करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ड्राईव्ह करत, शेजारी मुख्यमंत्री शिंदेंना बसवून प्रवासाचा आनंद घेतला. यावेळी त्यांच्या ताफ्यावर मोठी पुष्पवृष्टी करण्यात आली. ((पुलाची एक बाजू खुली करण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुलाची पाहणी करतायेत.))