Mumbai Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास सुपरफास्ट; कसा आहे कोस्टल रोड कसा आहे?

Continues below advertisement

मुंबई : कोस्टल रोडचा (Coastal Road)  दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मरीन ड्राइव्ह (Marine Drive) ते हाजी अली (Haji Ali) दरम्यानचा हा बोगदा आजपासून सुरू होतोय. हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. मुख्यमंत्री आणि दोेन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यावर हा मार्ग खुला होणार आहे. या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा अत्यंत गजबजलेला मार्ग अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती.  

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,  आज पुन्हा एकदा वाहतुकीला दिलासा मिळेल, वरळीकडे जाणार मार्ग आज खुला झाला.  6.5  किमीचे अंतर आहे पुढील रस्ता 10  जुलै रोजी सुरू करत आहोत. पहिला टप्पा सुरू केला.  दुसरा टप्पा सुरू करत आहोत तिसरा टप्पा 10 जुलै रोजी होईल. आधी 40 ते 50 मिनिटं लागत होती आता 9 मिनिटात हा टप्पा पार करता येणार आहे.  अत्यावशक सर्व यंत्रणा या भूमिगत रस्त्यात आहेत.  लवकरच हा रस्ता वरळी सी लिंकला जोडला जाईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram