Mumbai Coastal Road : कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत आदित्य ठाकरेंचं नाव
abp majha web team
Updated at:
11 Mar 2024 10:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Coastal Road : कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत आदित्य ठाकरेंचं नाव
मुंबईकरांसाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. याचं कारण म्हणजे वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर प्रवास अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार आहे. येत्या काही दिवसांत कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडण्यात येणार आहे. हा जोडरस्ता पूर्ण झाल्यावर मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्रेमध्ये उतरणं शक्य होणार आहे.