CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदारकीची शपथ घेणार
Continues below advertisement
कोरोनाच्या संकटात राज्याची परिस्थिती अत्यंत नाजूकपणे हाताळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदार होणार आहेत. दुपारी १ वाजता उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आमदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारतील आणि आमदारकीची शपथ घेतील. यंदा कोरोनाच्या संकटात विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकासआघाडीकडून प्रयत्न करण्यात आले. त्यात काँग्रेसनं दोन उमेदवार दिल्यानं वाद उफाळला होता. पण, मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडीतल्या नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसनं राजकिशोर मोदी यांची उमेदवारी मागे घेतली. आणि अखेर, विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी बिनविरोध निवडणूक करण्यात आली.
Continues below advertisement