Devendra Fadnavis Book Launch | केवळ मला समजावं म्हणून फडणवीसांनी हे पुस्तक लिहिलं : मुख्यमंत्री

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस लिखित 'अर्थसंकल्प - सोप्या भाषेत' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा आज विधिमंडळाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विधाससभा अध्यक्ष नाना पटोले, सभापती रामराजे निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री अनिल परब आणि भाजप आमदार चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमानिमित्त सत्ताधारी-विरोधक आज एकाच मंचावर आले. त्यामुळे या दिग्गजांनी एकमेकांना टोले आणि टोमणे मारले नसते तरच नवल. विशेष म्हणजे राज्यात रंगलेल्या सत्ता नाट्यानंतर देवेंद्र फडणवीसांची फिरकी घेण्याची एकही संधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सोडली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola