
Corornavirus | रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून काल दिवसभरात 1 लाख 11 हजारांचा दंड वसूल
Continues below advertisement
रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून मुंबई महापालिकेने काल (१८ मार्च) दिवसभरात एक लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने ठिकठिकाणी मार्शल तैनात केले आहेत. शिवाय दंडाची रक्कमही २०० रुपयांवरुन १ हजार रुपये करण्यात आली आहे. काल दिवसभरात १११ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामधून महापालिकेने १ लाख ११ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
Continues below advertisement