![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/43819da6030dcdc0cb0a6122ad519802_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Mumbai Childrens Vaccine : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात ABP Majha
Continues below advertisement
देशात आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु झालंय. राज्यात जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झालाय. तर कोल्हापूर, नागपूरसह इतर भागातही मुलांचं लसीकरण सुरु झालंय. देशात लसीकरणासाठी आठ लाखांवर मुलांनी आतापर्यंत कोविन अॅपवर नोंदणी केलीय. लसीकरण नोंदणीसाठी दहावीचं ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. सध्या लहान मुलांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. मुलांनी न घाबरता लस घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.
Continues below advertisement