Maratha Protest | रस्त्यावर झोपण्याची वेळ आलेल्या मराठा आंदोलकांना नितेश राणेंची मदत

Continues below advertisement
मुंबईतील आझाद मैदानावर जवळपास महिनाभरापासून आंदोलनाला बसलेल्या मराठा आंदोलकांना रस्त्यावर झोपण्याची वेळ आल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. या बातमीची दखल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी घेतलीय. काळाचौकीतील कमलाबाई मोरे सभागृहात या आंदोलकांची राहण्याची सोय नितेश राणे यांनी केलीय. आझाद मैदानावरील या आंदोलनाकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येतय. त्याचबरोबर त्यांना आमदार निवास सोडण्याची सूचना केली. त्यामुळं या आंदोलनांवर रस्त्यावर झोपण्याची वेळ आली होती. तशी बातमी एबीपी माझानं काल दाखवली होती. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram