Mumbai Local Masjid Bander : लोकलच्या धडकेत एका प्रवाशाचा मृत्यू, 3 प्रवासी जखमी
Continues below advertisement
मध्य रेल्वेच्या (Central Railway) कर्मचाऱ्यांनी CSMT येथे अचानक आंदोलन पुकारल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. 'प्रवाशांचा या सगळ्यामधे काय दोष?', हा प्रश्न विचारात न घेता झालेल्या या आंदोलनामुळे कामावरून घरी परतणाऱ्या लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. काही महिन्यांपूर्वी मुंब्रा (Mumbra) येथे झालेल्या रेल्वे अपघाताप्रकरणी दोन अभियंत्यांवर (Engineers) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई मागे घ्यावी, या मागणीसाठी सायंकाळी गर्दीच्या वेळी हे आंदोलन करण्यात आले. यामुळे CSMT, ठाणे (Thane) आणि इतर स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आणि मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. रेल्वे कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील वादामुळे प्रवाशांना वेठीस धरले गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement