Mumbai Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Feb 2022 07:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलनं प्रवास करत असलेल्या मुंबईपासून कर्जत-कसारापर्यंतच्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. आजपासून ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ७२ तासांचा जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा जम्बोब्लॉक असेल. मध्यरात्री १२ वाजल्यानंतर कामाला सुरुवात झालेली आहे. आणि थेट सोमवारी रात्री बारा वाजता नव्या मार्गिकेचं काम पूर्ण होईल. या मेगाब्लॉकच्या कालावधीत जवळपास ३५० लोकल धावणार नाहीत. त्याशिवाय शंभरपेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.