AC Local | उद्यापासून मध्य रेल्वेचा गारेगार प्रवास, ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल 16 फेऱ्या धावणार | ABP Majha

मध्य रेल्वेच्या पहिल्या लोकलचे उद्या उद्घाटन होणार आहे. ही लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवली जाणार आहे. त्यामुळे या लोकांची उद्घाटनाची फेरी ही पनवेल पासून सुरू होईल ते ठाण्यापर्यंत येईल. सीएसएमटी स्टेशनवरून रिमोट कंट्रोलद्वारे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर ठाणे स्थानकात आल्यानंतर शिवसेने चे खासदार राजन विचारे आणि राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लोकांना हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola