महाराष्ट्रातील वस्त्या,उपनगरांची जातीवाचक नावे बदलणार;सामाजिक न्याय खात्याकडून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव
महाराष्ट्रातील वस्त्या आणि उपनगरांची जातीवाचक नावे बदलणार आहेत. माळीवाडा, महारावस्ती, मांगवस्ती, कुंभारवाडा, माळीनगर अशी जातीवाचक नावे बदलून समतानागर, शाहूवस्ती, ज्योती नगर, भीम नगर अशी होणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्याय खात्याकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती.
प्रत्येक गाव, शहरात आशा जातीवाचक नावाच्या वस्त्या होत्या. आता महाराष्ट्र सरकारचा याबाबत निर्णय घेणार आहे.