Mumbai : मुंबईत कॅन्सरचे रुग्ण अजूनही फुटपाथवर, म्हाडाने जाहीर केलेली घरं कधी मिळणार?

Continues below advertisement

मुंबईत कॅन्सरवरील उपचारासाठी येणारे रुग्ण आणि नातेवाईकांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी म्हाडानं घरं देण्याचा निर्णय जाहीर करून वर्ष उलटलं तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे टाटा हॉस्पिटलमध्ये येणारे गरीब कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अजूनही फुटपाथवरच राहण्याची वेळ आलीय. मुंबईत बॉम्बे डाईंग मिलच्या जागेत उभारलेल्या म्हाडा प्रकल्पात या रुग्णांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात येणार होती. पण घरं अजूनही मिळालेली नाहीत. त्यामुळे कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी भर पावसात फुटपाथवर ताडपत्री लावून आसरा घेतलाय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram