BMC Vaccination : मुंबईत ज्येष्ठ नागरिकांचं घरोघरी जाऊन लसीकरण, BMC कडून वॉर्डनिहाय लसीकरण कँप
मुंबई : मुंबई महानगरपालिका पुढील आठवड्यात वॉर्ड रचनेनुसार लसीकरणाचे कँप सुरू करण्याच्या विचारात आहे. या वॉर्ड लसीकरण मोहिमेतून 70 हजार लोकांचं लसीकरण करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. मुंबईतील लसीकरणाबाबत नुकतीच हायकोर्टात पालिका आयुक्तांसोबत एक बैठक झाली. या बैठकी त्यांनी ही माहिती दिल्याचं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी स्पष्ट केलं.
ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल झाली. त्यावरील सुनावणी दरम्यान ही गोष्ट समोर आली. परदेशात अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. भारतातही केंद्र सरकारनं किमान ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा सुरू करायला हवी होती. जेणेकरून लसीकरणासाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना होण्याचा धोका कमी झाला असता. या प्रक्रियेतून अनेकांचा प्राण वाचवता आले असते, असंही हायकोर्ट पुढे म्हटलं.