Mumbai BMC Hospital Reality Check : महापालिकेच्या LTT आणि J J रुग्णालयाचा 'माझा'कडून रिअॅलिटी चेक
Mumbai BMC Hospital Reality Check : महापालिकेच्या LTT आणि J J रुग्णालयाचा 'माझा'कडून रिअॅलिटी चेक
मुंबईतल्या पालिका आणि सरकारी रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआयसाठी महिनोमहिने प्रतीक्षा, एबीपी माझाकडून रिअॅलिटी चेक...लक्ष घालण्याचं मुश्रीफ, केसरकरांंचं आश्वासन...
मुंबईतल्या पालिका आणि सरकारी रुग्णालयांत उपचारासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नाही परराज्यातूनही मोठ्या संख्येनं रुग्ण येतात...ही रुग्णालयनं नावाजलेली आहेत. पण जेव्हा एबीपी माझाने या रुग्णसेवेचा रिऍलिटी चेक केला, तेव्हा तर धक्कादायक वास्तव समोर आलंय...मुंबईतल्या या नामवंत सरकारी रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन आणि एमआरआयच्या चाचणीसाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागतेय...बिघडलेल्या मशिन्स आणि त्यांची कमतरता, याची कुणाला पर्वाच नसल्याचं आढळून आलंय...राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्या अर्थ संकल्पात आरोग्य विभागासाठी करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या तरतूदीचा वापर नेमका होतो कुठे? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय.