Elections: मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका पुढे ABP Majha

मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या आगामी निवडणुका किमान सहा महिने तरी पुढे जाणार हे आता निश्चित झालं आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आयोग सुधारणा विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. ओबीसींना निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळवून देण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं  कायद्यात बदल करण्याचं विधेयक दोन्ही सभागृहात मांडलं होतं. सदर विधेयक दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूरही झालं. त्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होेतं. राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केल्यामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी आता काहीशी कमी झाली आहे. मुंबईसह विविध महापालिकांच्या निवडणुका पुढे गेल्यामुळं, आता राज्य सरकारला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा नव्यानं गोळा करण्यासाठी चारपाच महिन्यांचा अवधी मिळणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola