BMC Budget 2021 : आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार
मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. या मुंबई महापालिकाचे बजेट सादर आज सादर होणार आहे. कोरोना आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यात 'अर्थसंकल्प देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको', अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केलीय. असं असतानाच उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पातून पूर्ण होणार का? मुंबईकरांसाठी काय नव्या घोषणा केल्या जातील? याकडं लक्ष लागले आहे.