Mumbai : बीकेसीच्या महानगर गॅस पंपावर जोरदार राडा, सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी
मुंबईत बीकेसी इथं महानगर गॅस पंपावर जोरदार राडा झालाय. पंपावरील सुरक्षारक्षक आणि रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. गॅस भरण्याच्या वादातून सुरुवातीला बाचाबाची झाली आणि त्यानंतर या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं.. बीकेसी पोलीस स्टेशनच्या बाजूला ही घटना घडलीय.