Mumbai : सरकारमध्ये औरंगजेबाचा आत्मा आलाय,मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी Sudhir Mungantiwar आक्रमक
Continues below advertisement
कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडण्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. यासाठी भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसंच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Continues below advertisement