Mumbai BJP BMC Election Plan : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर फेरीवाल्यांकडे भाजपचं लक्ष
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं कंबर कसलीये. मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपने मुंबईतल्या प्रत्येक घटकापर्यत पोहोचण्याचा निर्धार केलाय. आता मुंबई भाजपच्या वतीने मुंबईतील फेरीवाल्यांच्या समस्या आणि फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात करण्यात येणार आहे. यासाठी भाजपा हॉकर्स युनिटच्यावतीने मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.