Mumbai : भांडुपच्या जलबोगद्याचं काम 18 दिवसांत पूर्ण, मुंबईतली पाणीकपात रद्द होण्याची अपेक्षा

Continues below advertisement

मुंबईतल्या पाणीपुरवठ्यासाठी भांडूप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाण्यात झालेली गळती दुरुस्ती करण्याचं काम बीएमसीच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागानं नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसांत पूर्ण केलं आहे. पण हा जलबोगदा पूर्ण क्षमतेनं भरुन कार्यान्वित करण्यासाठी आणखी तीनचार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळं मुंबईचा पाणीपुरवठा हा रविवार २३ एप्रिलपासून पूर्ववत होणं अपेक्षित असल्याचं जल अभियंता विभागानं म्हटलं आहे. भांडूप संकुलातल्या जलशुध्दीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा गुंदवलीहून येणाऱ्या जलबोगद्यातून होतो. ठाण्यात कूपनलिकेसाठी खोदकाम सुरू असताना याच जलबोगद्यास हानी पोहोचून पाणीगळती सुरू झाली होती. या गळतीच्या दुरुस्तीसाठी ३१ मार्चपासून जलबोगदा बंद करण्यात आला होता. त्यामुळं ‍मुंबई महापालिका क्षेत्रात ३१ मार्चपासून ३० दिवसांसाठी १५ टक्‍के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. मुंबईचा पाणीपुरवठा रविवारपासून सुरळीत सुरु झाल्यावर ही १५ टक्के पाणीकपात रद्द करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram