Mumbai Vaccination Record : मुंबई ठरला देशातील 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार करणारा पहिला जिल्हा!
Continues below advertisement
मुंबई : देशात गेल्या काही दिवसात कोरोना लसीचे डोस देण्याचा विक्रम करण्यात आला आहे. आता लसीकरणाच्या बाबतीत मुंबईने देखील एक विक्रम केला आहे. देशात एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबईचा क्रमांक लागला आहे. कोविन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
कोविन अॅपवरील माहितीनुसार मुंबईत 1 कोटी 63 हजार 497 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यामध्ये 72 लाख 75 हजार 134 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर 27 लाख 88 हजार 363 नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहे. सध्या मुंबईत 507 केंद्रावर लसीकरण मोहिम सुरू आहे. यापैकी 325 सरकारी केंद्र आहे तर 182 केंद्र हे खाजगी आहे.
Continues below advertisement