Mumbai Bandra Railway Station : मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना

Continues below advertisement

Mumbai Bandra Railway Station : मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना

शहरातील अत्यंत गर्दी होणारे रेल्वेस्थानक म्हणून ओळख असलेल्या वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत एकूण 9 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत.  नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची घटना घडली. सकाळी सहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेतील सर्व जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली.  सकाळी 5.10 वाजता रेल्वे एबीपी माझ्याच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी गोरखपूरला जाणारी रेल्वे सुटते. सध्या दिवाळी आणि छटपूजा आहे. त्यामुळे या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रणाणात प्रवासी जमले होते. मात्र चेंगराचेंगरी झाल्याने एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रक्रिया स्थिर आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. दुर्घटनेच्या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा रेल्वे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram