JNU Protest | गेट वे ऑफ इंडियावरुन आझाद मैदानात हलवल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन मागे | ABP Majha

जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच आंदोलन आझाद मैदानावर स्थलांतरित केलं होतं. आझाद मैदानावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन मागे घेतले असले तरी निषेध सुरुच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी माझाशी बोलताना सांगितले. दरम्यान, या ठिकाणी आंदोलनाला कुठलीही परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola