Mumbai Drugs Case : क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात Aryan Khanसह तिघांना NCB कोठडी ABP Majha

Continues below advertisement

मुंबई : मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना उद्यापर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली आहे. काल मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीमध्ये केलेल्या छाप्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. उद्या दुपारी 2.30 वाजता कोर्ट क्रमांक 8 मध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

एनसीबीने शनिवारी रात्री क्रूझवर छापा टाकला आणि तेथून आठ जणांना ताब्यात घेतले. सर्व लोकांची सुमारे 16 तास सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान, एनसीबीला माहिती मिळाली की त्यांना ज्याने ड्रग्ज दिले तो बेलापूर, नवी मुंबई येथे राहत होता.

गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी संध्याकाळी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला आणि पार्टी करणाऱ्या काही प्रवाशांकडून ड्रग्ज जप्त केली.

एनसीबीने म्हटले आहे, की "ऑपरेशन दरम्यान, संशयितांचा शोध घेण्यात आला आणि त्यांच्याकडून वेगवेगळे अंमली द्रव्य जप्त करण्यात आले, जे त्यांनी त्यांच्या कपड्यांमध्ये, अंडरवेअरमध्ये आणि (महिला) पर्समध्ये लपवले होते. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ताब्यात घेतलेल्यांना आता न्यायालयात हजर केले जाईल. जे त्यांनी त्यांचे कपडे, अंतरवस्त्रे आणि (महिलांनी) पर्समध्ये लपवले होते. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ताब्यात घेतलेल्यांना आता न्यायालयात हजर केले जाईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram