Mumbai : 'अर्थसंकेत'च्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळं आणि उद्योजकांचा गौरव

 'कोरोना'च्या आर्थिक संकटानंतर उद्योगविश्वानंही हळूहळू भरारी घेण्यास सुरुवात केली आहे. 'अर्थसंकेत'च्या डॉ अमित बागवे आणि रचना बागवे यांनी 'प्रारंभ' या थीम वर दादरच्या शिवाजी मंदिरात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक विको लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढारकर यांनी उपस्थिती राखली. त्यांच्या हस्ते गणेशोत्सव मंडळं आणि उद्योजकांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना पेंढारकर यांनी उपस्थित उद्योजकांना आपापले उद्योगविश्व समृध्द करुन मराठी पाऊल पडते पुढे असा ठसा तुम्ही निर्माण करण्याचा संदेश दिला. चिकाटी, मेहनत आणि कामाप्रति राखलेली निष्ठा आपल्याला ध्येयापर्यंत निश्चित पोहोचवते, असा विश्वासही त्यांनी दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola