Kangana Ranaut | मुंबई महापालिकेविरोधात कंगनाने दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून युक्तिवाद
Continues below advertisement
कंगना रनौत विरूद्ध बीएमसी या वादावर उद्या शुक्रवारपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. अर्धवट पाडकाम केलेली वास्तू तशीच ठेवता येणार नाही असं स्पष्ट करत शुक्रवारी याचिकाकर्ता कंगना रनौतला हायकोर्टान युक्तिवाद सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी बनवण्याची मागणी कंगानानं कोर्टाकडे केली आहे. त्यावर राऊत यांचे वकील प्रदीप थोरात यांनी कोर्टाला सांगितलं की त्यांना कोर्टाची नोटीस गुरूवारी सकाळी मिळाली आहे. त्यामुळे यावर उत्तर देण्यासाठी थोडा अवधी देण्यात यावा अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आली. तर दुसरूकडे पालिका अधिकारी भाग्यवंत लोटे यांनीही उत्तर देण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागून घेतला. दोघांनाही पुढील आठवड्यात मंगळवारपर्यंत आपलं उत्तर सादर करण्यासाठी कोर्टानं मुदतवाढ दिली आहे. मात्र कारावाई करताना पालिका तत्पर होती, मात्र आम्ही काही विचारलं तर तुम्हाला वेळ हवाय असा टोला न्यायमूर्ती काथावाला यांनी लगावला.
Continues below advertisement