Mumbai Airport Lighting : मुंबई विमानतळ रंगीबेरंगी दिवे, वस्तूंनी सजवलं
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. त्यामुळं सध्या मुंबईत सर्वसामान्यांच्या झोपडीपासून हेरिटेज दर्जा लाभलेल्या शासकीय वास्तूही रोषणाईनं उजळून निघाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेनं तर अवघं शिवाजी पार्क दिव्यांच्या झगमगाटात सजवलं आहे. त्यापाठोपाठ मुंबईत येणाऱ्या देशीविदेशी पर्यटकांना दिवाळीच्या आनंदात सामील करून घेण्यासाठी मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळही रंगीबेरंगी दिवे आणि दुर्मिळ अशा वस्तूंनी सजवण्यात आलं आहे.
Tags :
Diwali Chhatrapati Shivaji Maharaj International Airport MNS Heritage Status Shivaji Park Raj Thackeray Mumbai Hut Festival Of Lights Government Building Illumination