Mumbai Air Quality : मुंबईतील हवेचा दर्जा खालावला, धुलीकणांचं प्रमाणा अतिधोदायक पातळीवर

Continues below advertisement

मोसमी पाऊस परतून वाऱ्यांचा वेग कमी होताच मुंबईतील हवेचा दर्जा आता खालावू लागला आहे. सफर या संस्थेच्या नोंदींनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून वाईट श्रेणीत नोंदला जात आहे. वातावरणातील घातक पीएम २.५ आणि पीएम १० धूलीकणांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. विलेपार्ले येथे सोमवारी सायंकाळी अतिधोकादायक हवेची नोंद झाली असून हवा गुणवत्ता निर्देशांक ३१८ नोंदवला गेला. या हवेत घराबाहेर पडणेही धोकादायक ठरू शकते. या शिवाय माझगाव, कुलाबा, अंधेरी, मालाड, परळ, मुलुंड या परिसरातील हवा अतिवाईट असल्याची नोंद सोमवारी झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram