Rishi Kapoor Passes Away | ऋषी कपूर यांचं निधन, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
जगभरात कोरोनाचं संकट असतानाच, बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल जगाला अलविदा केल्यानंतर आज बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केला तर मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली.