Mumbai AC Local | सीएसएमटी- कल्याण एसी लोकल सुरु; डोंबिवलीतील प्रवाशांना काय वाटतं?

Continues below advertisement

मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कल्याणदरम्यान एसी लोकल रेल्वेला हिरवा कंदील दाखविण्यात आल्यानंतर. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा एसी लोकलने प्रवास करता येणार आहे. आजपासून या मध्य रेल्वेवर सोमवार ते शनिवार रोज या एसी लोकलच्या दिवसाला 10 फेऱ्या असणार आहेत. सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर ही लोकल धावणार आहे.

सोमवार ते शनिवार सकाळी 5.42 ते रात्री 11.25 या वेळेत एसी लोकल धावणार आहे. यात दोन सीएसएमटी ते कल्याण, चार सीएसएमटी ते डोंबिवली आणि चार सीएसएमटी ते कुर्ला अशा फेऱ्या असणार आहेत. पहिली लोकल सकाळी 5.42 ला कुर्ल्यावरून सीएसएमटीसाठी सुटेल,  तर शेवटची लोकल रात्री 11.25 ला वाजता सीएसएमटीवरून कुर्ल्यासाठी सुटेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram