Mumbai : मुंबईतल्या आरे कॉलनीत कळस यात्रेदरम्यान दोन गटात तुफान राडा ABP Majha

मुंबईतल्या आरे कॉलनीतील गौतम नगर भागात काल रात्री दोन गटात तुंबळ राडा झाला... परिसरातील शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान रात्री ८ वाजता दोन गटात वाद झाला आणि या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. या हाणामारीत ८ ते १० जण जखमी झाले आहेत... घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला आणि गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलंय. या घटनेसाठी पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.. सद्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola