Mumbai Pune Homes : देशात गेल्या तिमाहीत मुंबई , पुण्यात सर्वाधिक घरांची विक्री

Continues below advertisement

Mumbai Pune Homes : देशात गेल्या तिमाहीत मुंबई , पुण्यात सर्वाधिक घरांची विक्री यानंतर मुंबईतून बातमी ... मुंबईत गेल्या 3 महिन्यात तब्बल 41 हजार घरांची खरेदी झालीय. गेल्या तीन महिन्यात 1 लाख कोटी रुपयांच्या घरांची विक्री झालीय. गेल्या वर्षीप्रमाणेच नववर्षातही देशात गृहखरेदीचा जोर कायम असून नववर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत घरांची विक्रमी विक्री झाली.. या गृहविक्रीतून तब्बल १ लाख कोटी रुपयांची उलाढाल झालीय.. हा आजवरचा उच्चांक असून गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गृहविक्रीमध्ये ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात गेल्या तीन महिन्यांत  मुंबईतील घरांची विक्री ही सर्वाधिक आहे..  तीन महिन्यांत मुंबईत ४१ हजार ५९० घरांची विक्री झाली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर असून पुण्यात एकूण २३ हजार ११० घरांची विक्री झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram