Water Cut In Mumbai | मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 5 ऑगस्टपासून 20 टक्के कपात
5 ऑगस्टपासून मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 20 टक्के कपात करण्यात येणार आहे. राज्यभरात चांगला पाऊस होतोय, पण मुंबईत पाऊस फारसा समाधानकारक पडलेला नाही. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 34 टक्के साठाच शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीला तोंड द्यावं लागणार आहे.