Mumbai | लालबागमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; लग्नकार्य असलेल्या घरात स्फोट, 16 जण जखमी
लालबागमधील साराभाई मेन्शमधील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झालानं 16 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे. सकाळी सात वाजल्याच्या सुमारात ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या घरात स्फोट झाला त्या घरामध्ये लग्नकार्य आहे. साराभाई मेन्शमध्ये राहणाऱ्या राणे कुटुंबियांच्या घरात त्यांच्या मुलीचं लग्न असून आज हळदीचा कार्यक्रम होता.