Mumbai : चेंबूरमध्ये दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू; एनडीआरएफचं पथक घटनास्थळी, बचावकार्य सुरु

मुंबई :  मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अशात पावसामुळं दरड आणि घरं कोसळण्याच्या घटना देखील घडत आहेत. शनिवारी मध्यरात्री चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे 11 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून घरांच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत पडल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola