Mumbai : टाटा मधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाकडून 100 फ्लॅट राहण्यासाठी उपलब्ध
मुंबईतल्या टाटा मेमोरिअल रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी परळ भोईवाडा परिसरात म्हाडाकडून 100 फ्लॅटस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डिसेंबर 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहनिर्माण विभागाकडून टाटा मेमोरियल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना मुंबईत राहण्यासाठी म्हाडाकडून शंभर फ्लॅट्स मंजूर करण्यात आले होते. मधल्या काळात टाटा रुग्णालयाला हे फ्लॅट हस्तांतरित करण्यात आले. आता या 100 फ्लॅट्समध्ये रोटरी क्लबच्या मदतीनं सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.