ST | कर्मचाऱ्यांचे पगार, एसटी सुरु ठेवण्याच्या किमान खर्चासाठी सरकारकडे 3600 कोटींची मागणी: अनिल परब
कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये एसटी उत्पन्न बुडाले आहे. एसटी तोट्यात आहे. एसटी सुरु ठेवणं सरकारचे कर्तव्य आहे. कामगारांचेही पगार झालेले नाहीत. त्यांचे पगार, एसटी सुरु ठेवण्याचा किमान खर्च यासाठी सरकारकडे 3600 कोटी मागितले आहेत. तसंच सरकारची आर्थिक स्थिती पाहता बाहेरुन पैसे उभे करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहित परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.